उद्योग आणि मराठी माणूस

99

✔ लेखक: प्रा. प्रकाश भोसले
✔ प्रकाशक: नवी अर्थक्रांती प्रकाशन 

अधिक माहिती

मराठी उद्योजकाला उद्योग/व्यवसाय हा शब्द ऐकल्यावरच एक प्रकारची भीती मनात वाटते. एखादी मराठी व्यक्ती व्यवसायात उतरते तेव्हा तिला सर्वत्र विरोध समस्या आणि अडचणी यांना तोंड द्यावे लागते.

त्यानंतर व्यवसाय सुरु झाला की तो कसा करावा? उद्योग करताना सल्ला कोणाचा घ्यावा? जर अपयश आले तर ते पचवून पुढे कसे जायचे? भांडवल कसे उभे करावे? आपण उद्योगामध्ये कमी कुठे पडतो? असे अनेक प्रश्न आ वासून उभे राहतात.

या आणि अशाच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून आपल्याला मिळणार आहेत.

नवी अर्थक्रांती हे एक प्रकाशन असून या अंतर्गत उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित पुस्तके प्रकाशित करण्यात येतात, तसेच व्यवसायात येणाऱ्या सर्व समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते. समाजातील सर्व स्तरावर आर्थिक ज्ञान पोहोचवणे व त्यातून वेगवान विकास घडवून आणणे हे ध्येय घेऊन उद्योगविषयक माहिती, आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान, चालू घडामोडी तसेच प्रेरणादायक गोष्टींनी परिपूर्ण केवळ चांगल्या आणि उत्कृष्ट ज्ञानाचा शोध घेणे व त्याला प्रकाशित करणे, हे काम आम्ही विविध समाज माध्यमांतून करत आहोत.