मला उद्योजक व्हायचंय!

99

लेखक – निलेश वाघचौडे, राम खुस्पे
प्रकाशक: नवी अर्थक्रांती प्रकाशन
पाने – १३६

अधिक माहिती

मराठी उद्योजकांना बिझनेस आयडियापासून यशस्वी होण्यापर्यंत मार्गदर्शन करणारे पुस्तक “मला उद्योजक व्हायचंय!” हे पुस्तक अशा लोकांसाठी आहे,जे सध्या नोकरी करत आहेत; पण त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा आहे. हे पुस्तक अशा उद्योजकांनासुद्धा उपयुक्त ठरेल, जे सध्या त्यांच्या व्यवसायात अनेक आव्हानांचा आणि अडचणींचा सामना करत आहेत. उद्योजक होण्याची इच्छा मनात असणाऱ्या असंख्य तरुणांना या पुस्तकातील गोष्टी उपयोगी पडतील.

पुस्तकात काय वाचाल?

✔ नोकरी करावी की व्यवसाय?
✔ उद्योजकांमध्ये आवश्यक घटक
✔ आव्हानांचा सामना कसा करायचा?
✔ वॉरेन बफेट यांची कथा
✔ पैशाचे व्यवस्थापन उद्योजक घडण्याची प्रक्रिया कशी असावी
✔ कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, कोणत्या टाळाव्यात?
✔ टीम कशी तयार करावी
✔ सहकाऱ्यांच्या मनात सतत प्रेरक विचार जागृत कसे ठेवावेत
✔ उद्दिष्टं साध्य कशी करावीत
✔ जगप्रसिद्ध उद्योजकांच्या यशाचं रहस्य

अशा अनेक गोष्टींवर आपल्याला या पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

नवी अर्थक्रांती हे एक प्रकाशन असून या अंतर्गत उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित पुस्तके प्रकाशित करण्यात येतात, तसेच व्यवसायात येणाऱ्या सर्व समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते. समाजातील सर्व स्तरावर आर्थिक ज्ञान पोहोचवणे व त्यातून वेगवान विकास घडवून आणणे हे ध्येय घेऊन उद्योगविषयक माहिती, आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान, चालू घडामोडी तसेच प्रेरणादायक गोष्टींनी परिपूर्ण केवळ चांगल्या आणि उत्कृष्ट ज्ञानाचा शोध घेणे व त्याला प्रकाशित करणे, हे काम आम्ही विविध समाज माध्यमांतून करत आहोत.